शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष, हे सरकार पाच वर्ष टिकेलच – शरद पवार

sharad pawar uddhav thackeray

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आज २२ वा वर्धापन दिन आहे. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आल्यानंतर शरद पवारांनी स्वतंत्र मोट बांधत राष्ट्रवादी काँग्रेसची बीजं पेरली. तिच राष्ट्रवादी काँग्रेस आज राज्यातील सत्तेत महत्त्वाच्या भूमिकेत वावरताना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधतना सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी बद्दल महत्वाचे विधान केले आहे.

‘कधी वाटलं नव्हतं शिवसेनेबरोबर आपण सरकार बनवू. शिवसेना विश्वास असणारा पक्ष आहे. हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पण हे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल’, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधतना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकशाही टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहिली आहे. असे विधान केले आहे.

‘केंद्रात भाजपचं सरकार आहे. या सरकारने देशातील एकता आणि आखंडतेला धक्का देण्याचं काम सुरू केलं आहे. लोकशाही संस्था मोडीत काढण्याचं काम सुरू केलं आहे. पत्रकारांपासून अनेक घटकांची मुस्कटदाबी सुरू आहे. लोकशाहीला झुंडशाहीचं स्वरुप देण्याचं काम सुरू आहे. संविधान वाचवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. अशावेळी लोकशाही टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहिली आहे, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

IMP