शिवसेना एकटी सरकार चालवत नाही… राष्ट्रवादीच्या नेत्याचे खडेबोल

fadnavis raut pawar

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसात राजकीय भूकंपाच्या घडामोडी सुरु असल्याचे अंदाज वर्तवले जात होते. ऑक्टोबर महिन्यात राजकीय भूकंपाचे भाकीत अनेक नेत्यांनी वर्तवले होते. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये असलेली धुसफूस, राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपशी असलेली गुपित जवळीक, काँग्रेसशी विरोधी विचारधारा असलेली शिवसेना हे सगळे मुद्दे बघता राजकीय हालचाली महत्वाच्या आहेत.

कालच्या राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भाष्य केले असून ‘हे सरकार एकट्या शिवसेनेचे नाही’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. यासह त्यांनी शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीद मेमन यांनी या भेटीवर भूमिका स्पष्ट केली आहे.

माजीद मेमन म्हणतात, “संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. पण, ही त्यांची व्यक्तिगत किंवा सामाजिक भेट असेल. या भेटीचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण, शिवसेना ही काही एकटी सरकार चालवत नाही तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्यांच्यासोबत आहे,” याची आठवणच एकप्रकारे त्यांनी शिवसेनेला करून दिली आहे.

यासोबतच, “संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी असा कोणताही राजकीय अधिकार दिलेला नाही. मुळात शरद पवार हे महाविकास आघाडीमध्ये समन्यवाची भूमिका पार पाडत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही”असं देखील त्यांनी सांगितलं. तर, “शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे कायम चर्चेत राहत असता. दररोज या ना त्या मुद्द्यावरून ते कायम बातम्यांमध्ये दिसत असतात. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जितके चर्चेत राहत नाही, तितके राऊत चर्चेत असतात.” असा खोचक टोला देखील मेमन यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :-