fbpx

शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला यायचा आहे – उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : काही दिवसांपूर्वी भाजपा अध्यक्ष अमित शहा लातूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी शिवसेनेला आणि मित्र पक्षांना सोबत आलात तर ठीक नाहीतर पराभूत करू,असे म्हणताना त्यांनी ‘पटक देंगे’ असा शब्दप्रयोग करून शिवसेनेला एकप्रकारे इशाराच दिला होता.आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्याला जशास तसे उत्तर दिले आहे.शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला यायचा आहे असे म्हणत त्यांनी ठाकरे शैलीत अमित शहांच्या इशाऱ्याला उत्तर दिले आहे.

स्थानिक लोकाधिकार समितीच्या अधिवेशनात ते बोलत होते.यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले,’ काही जण शिवसेनेला पटकण्याची भाषा करतात. मात्र शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आलेला नाही आणि येणारही नाही.यावेळी उद्धव ठाकरेंनी राम मंदिरांच्या मुद्द्यावरूनही मोदी आणि भाजपला लक्ष्य केले.राम मंदिर बांधण्यासाठी कॉंग्रेस अडथळा करत होती म्हणूनच जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे.पण तुम्ही राम मंदिर बांधल्याच दिसत नाही,असंही ते यावेळी म्हणाले.