सिडको-हडकोतील पाण्यासाठी शिवसेना आक्रमक

औरंगाबाद : उन्हाळ्याच्या तोंडावर शहरात तीव्र पाणी टंचाईस सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात आठ दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. सिडको-हडकोतील नागरिकांवर तर पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज (दि.२३ ) शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक व पदाधिकारी यांनी आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांची भेट घेत समस्या मांडल्या.

सिडको-हडकोतील पाणी प्रश्न हा अतिशय जुना आहे. नागरिकांना कुठलीही पूर्वकल्पना न देता पाण्याच्या वेळा आणि दिवस बदलले जात असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. जायकवाडी भरूनही शहरात सहा ते सात दिवसाआड पाणी येते. सिडको-हडकोवासियांना तर पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीसाठी संघर्ष करण्याची वेळ येउन ठेपली आहे.

काही दिवसापासून सात दिवसाला किंवा नवव्या दिवशी या पाणीपुरवठा होत असून वारंवार तक्रार करूनही अधिकारी लक्ष देत नाही पाणी असूनही फक्त पाणी टंचाई सिडको-हडको ला का असा सवाल शिवसेनेचे शिष्टमंडळ शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक व पदाधिकारी यांनी आज माननीय आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांची भेट घेत समस्या मांडल्या.

यावेळी आयुक्तांनी लवकरच पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची मीटिंग बोलवून प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले. यावेळी शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, अनिल पोलकर, नगरसेवक बन्सी जाधव, सीताराम सुरे, संजय हरणे, अनिल जायस्वाल, ज्योती पिंजरकर, संदेश कवडे, किशोर नागरे, गणपत खरात, मोहन मेघवाल यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या