पारनेरमध्ये शिवसेनेला धक्का, राष्ट्रवादीची आघाडी

shivsena ncp

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. मतदानावेळी काही ठिकाणी पावसाचे सावट असल्याने मतदानाचा टक्का काहीसा घसरताना दिसला. तर शहरी भागा पेक्षा ग्रामीण भागात मतदान मोठ्या प्रमाणात झाले आहे. काही एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार भाजप आणि शिवेसेनेला बहुमत मिळत असल्याच सांगण्यात येत आहे.

नगर जिल्ह्यातील पारनेरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके आघाडीवर आहेत. तसेच शिवसेनेचे विजय औटी सध्या पिछाडीवर आहेत. नगर जिल्ह्यातील इतर ठिकाणी कोपरगावमधून राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांनी आघाडी घेतली आहे. तसेच भाजपच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे या पिछाडीवर आहेत.

नगरमधून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी आघाडी घेतली आहे. त्यांचा सामना हा अनिल राठोड यांच्याशी होत आहे. त्यामुळे युतीला मोठा धक्का बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील येवल्यातून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आघाडी घेतली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधून आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :