fbpx

पालघरमध्ये शिवसेना तर भंडारा-गोंदियात भाजप आघाडीवर

टीम महाराष्ट्र देशा- राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या पालघर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून श्रीनिवास वनगा पोस्टल मतदानात आघाडीवर असल्याचं चित्र आहे. पालघरमध्ये भाजपा, शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी या तिन्ही पक्षांनी विजयाचा दावा केला आहे. वनगा यांना ६०९ मते मिळाली असून ३०२ मतांची आघाडी घेतली आहे.

सहा विधानसभा क्षेत्रांसाठी प्रत्येकी १४ असे एकूण ८४ मोजणी टेबल मांडण्यात येणार. प्रत्येक टेबलवर सुपरवायझर, सहाय्यक व मायक्रो ऑब्झरवर तसेच त्यांच्या जोडीला समन्वय साधणारे, डेटा एन्ट्री कर्मचारी असे सुमारे ६०० अधिकारी – कर्मचारी तैनात आहेत.

मतदानयंत्रांमधील दोषामुळे गाजलेल्या पालघरमध्ये फेरमतदान कोठे झालेले नाही. भंडारा-गोंदिया मतदारसंघात बुधवारी ४९ मतदानकेंद्रांवर फेरमतदान झाले. दोन केंद्रांवर यंत्रे बंद पडल्याने ती बदलण्यात आली. हे दोन अपवाद वगळता सर्वत्र व्यवस्थितपणे मतदान पार पाडले.
Live Updates:

– विक्रमगडमध्ये माकपा उमेदवार पुढे

– पोस्टल मतांमध्ये भाजपा आघाडीवर

– डहाणूमध्ये भाजपाचे राजेंद्र गावित पुढे