शिवसेनेकडून पंतप्रधान मोदींचा वारंवार अपमान झाला : देवेंद्र फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना हा आमचा मित्रपक्ष असून देखील त्यांच्या नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या स्तरावर टीका केली आहे, त्यामुळे अशा पक्षा बरोबर सत्ता स्थापन करावी का ? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सोपवला आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद सांधला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर भाष्य केले.

ते म्हणाले की, गेले १५ दिवस राज्यात सत्ता संघर्ष सुरु आहे. या संघर्षात आमचे मित्रपक्ष शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असतानाही शिवसनेकडून वारंवार मोदींना लक्ष्य केले जाते, ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. अशी कृती मित्रपक्षाकडून घडत असेल तर यांच्याबरोबर सरकार स्थापन करावे का ? असा प्रश्न फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

आजवर आमच्याकडून चर्चेची दार खुली होती, शिवसेनेला आमच्याशी चर्चा न करता काँग्रेस – राष्ट्रवादीशी चर्चा करायला वेळ होता. कदाचित पहिल्या दिवशी काँग्रेस – राष्ट्रवादीशी त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका कायम राहीली. भाजपसोबत चर्चाच करायची नाही हे धोरन शिवसेनेनं स्वीकारलं. भडक विधानकरून सरकार स्थापन होऊ शकत नाही. आम्हाला ऊत्तर देता येत पण तसं करणार नाही. काही लोकांनी पाहिल्या दिवसापासून जी वक्तव्य केली हि चुकीची आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा अनादर आम्ही कधीही करणार नाही. परंतु शिवसेनेने आमच्या नेत्यांवर खालच्या दर्जातून टीका केली. त्यामुळे अशा लोकांसोबत सरकार का करायचा हा आमच्यासमोर प्रश्न असल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या