शिवसेने शिवाय पर्याय नाही, भाजपच्या अंतर्गत सर्व्हेतून उघड

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना – भाजप हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले तर दोन्ही पक्षांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार भाजपने केलेल्या गुप्त सर्व्हे मधून हि बाब समोर आली आहे. त्यामुळे भाजप सतत शिवसेने समोर युतीचे प्रस्ताव का टाकत आहे याची कारण आता समोर येवू लागली आहेत.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांवर नजर टाकली असता असे दिसून येते कि ,२०१४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी शिवसेना-भाजप युतीने तब्बल ४१ जागा जिंकल्या होत्या. यामध्ये शिवसेनेने १८ आणि भाजपने तब्बल २२ जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला केवळ 2 तर राष्ट्रवादीला 4 जागा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ जागा मिळाली होती.

स्वतंत्र निवडणूक जर लढले तर भाजपने नुकत्याच केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार, शिवसेना-भाजपने युती केल्यास त्यांना 30 ते 34 जागा मिळू शकतात. मात्र जर दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास भाजप 15 ते 18 आणि शिवसेना केवळ 5 ते 8 जागा जिंकेल. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीला 22 ते 28 जागा मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

You might also like
Comments
Loading...