अकोला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. हनुमान चालीसा पठणाचा विषय अजूनही गरम असताना पाहायला मिळत आहे. यावरून विरोधी पक्षांकडून आरोप प्रत्यारोप होत असताना पाहायला मिळत आहेत. अशातच आता बच्चू कडू यांनी यात उडी घेतली आहे.
“शिवसेनेची दादागिरी ही प्रामाणिकपणाची आहे. ‘मातोश्री’ हे शिवसेनेचं श्रद्धास्थान आहे. त्याला ललकारण्याचा प्रयत्न शिवसैनिक कसे सहन करणार? दुसऱ्यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या राणा दाम्पत्याला लाज वाटायला हवी. जेलमध्ये राणा दाम्पत्याला पोलिसांकडून मारहाण झाली नाही याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानायला हवेत. आता राणा दाम्पत्याला तक्रार करण्यासाठी दिल्ली हेच एकमेव ठिकाण उरलं आहे. त्यांनी सरकारी कार्यालयात तक्रार केली तरी त्याची दखल भाजपच्या कार्यालयातून घेतली जाते,” असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे.
महत्वाची बातमी –