Share

Shivsena | कोल्हापूरात लोढा यांच्या विरोधात शिवसेनेची पोलीसात तक्रार, तर पोलिसांचा तक्रार नोंदवण्यास नकार

Shivsena | मुंबई : शिवप्रतापदिनी प्रतापगड येथे भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या सुटकेची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केली होती. यावरुन विरोधकांनी आक्रमक भूमीका घेतलेली पाहिला मिळाली. अशातच शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कोल्हापूर (Kolhapur) येथे मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला आहे आहे.

जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, रविकरण इंगवले यांच्यासह शिवसैनिक आले. यावेळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पीआय कटकधोंड यांना निवेदन देत जिल्हा प्रमुखांनी तक्रार नोंद करण्याची मागणी केली.

तक्रार नोंद न करता निवेदनाची पोच देण्यास पोलिसांनी तयारी दर्शवल्यामुळे तिथे शिवसैनिक आणि पोलीस यांच्यामध्ये वाद झाला आणि शिवसैनिकांनी पोलीस स्टेशन बाहेरच घोषणाबाजी करत मंगल प्रभात लोढा आणि पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

दरम्यान, गुरुवारी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असून त्यांना भेटून सदर निवेदन देण्यास दोन्ही जिल्हाप्रमुख व शिवसैनिक हे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे रवाना होत होते. मात्र, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सदर तक्रार नोंद करून घेत सातारा पोलिसांकडे वर्ग करण्यास सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

Shivsena | मुंबई : शिवप्रतापदिनी प्रतापगड येथे भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या सुटकेची तुलना मुख्यमंत्री एकनाथ …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now