fbpx

‘शिवसेनेनं मॅरेज ब्यूरो उघडलेला नाही प्रस्ताव स्वीकारायला’

टीम महाराष्ट्र देशा- भाजप-शिवसेना युतीची चर्चा होणार असल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत. या बातम्या निराधार असल्याचं सांगत वैतागलेल्या खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘चर्चेच्या प्रस्तावाच्या बातम्या केवळ राजकीय वर्तुळात फिरत आहेत. आमच्यापर्यंत कुणीही आलेलं नाही आणि प्रस्ताव स्वीकारायला शिवसेनेनं मॅरेज ब्यूरो उघडलेला नाही,’ असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले ‘आम्ही स्वबळाची घोषणा केली असून प्रस्ताव घ्यायला बसलेलो नाही. हल्ली सगळ्यांनाच शिवसेनेशी जवळीक साधावं असं वाटत आहे. पण शिवसेना येथे मुंडावळ्या बांधून प्रपोजलची वाट पाहत बसलेली नाही’, असं राऊत यांनी म्हटलं आहे.