सरकार पाच वर्षे टिकविण्याची जबाबदारी शिवसेनेची नाही !

Maharashtra's leading sector in industry - Industry Minister Subhash Desai

पुणे : शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या भाजप शिवसेना युती असून ही युती तोडण्याची पोकळ धमकी बऱ्याचवेळा शिवसेनेने दिली आहे. शिवसेना सत्तेसाठी लाचार असल्याचा आरोप विरोधक विरोधकांनी केला असून शिवसेना सरकारमधून केव्हाही बाहेर पडू शकते, असा इशारा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सुभाष देसाईंनी वृत्तवाहिनीशी बोलतांना दिला.

सुभाष देसाईं म्हणाले, आम्ही सरकारमध्ये आहोत याचा अर्थ सरकारच्या चुकीच्या आणि जनतेच्या विरोधातील धोरणाला आम्ही पाठिंबा कसे काय देऊ शकतो. काही मुद्यावर आम्ही विरोध करीत आलो आहोत त्यामध्ये गैर असे काही नाही. आज भाजपबरोबर आम्ही सत्तेत आहोत याचा अर्थ आम्ही त्यांना काही लिहून दिलेले नाही. सरकारला मेरिटवर आम्ही पाठिंबा दिला आहे. म्हणजे हे सरकार पाच वर्षे टिकविण्याची जबाबदारी आमची नाही. आम्ही केंव्हाही सरकारमधून बाहेर पडू शकतो.”