fbpx

अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन हे फक्त श्रीमंताच स्वप्न-उद्धव ठाकरे

Uddhav-Thackeray-1

वेबटीम-अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन म्हणजे श्रीमंताच स्वप्न असून हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच पियुष गोयल यांना रेल्वे मंत्री बनविण्यात आले आहे.अशी ठिका उद्धव ठाकरे यांनी सामना मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. पंतप्रधान मोदींच स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेच्या १०८,००० कोटींची लुट करण्यात येत आहे.
भारताच्या पहिल्या हाय-प्रोफाइल हाय स्पीड रेल्वे प्रोजेक्टची पायाभरणी गुरुवारी अहमदाबाद येथे करण्यात आली.जपान या प्रकल्पासाठी अगदी नखां पासून ते रेल्वे पर्यंत कामगारापासून ते तंत्रज्ञाना पर्यंत सर्व काही जपानमधून आणत आहे.या प्रकल्पासाठी खर्च होणारा पैसा हा महाराष्ट्र आणि गुजरात च्या जनतेच्या खिशातून जात आहे आणि नफा मात्र जपान कमावत आहे.

मुंबई उपनगरातील अनेक प्रकल्प अपुऱ्या निधीमुळे रखडले आहेत.मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हे फक्त श्रीमंताच स्वप्न असून सर्वसामान्य लोकांना त्यांचा काहीच उपयोग नाही.गुजरात च्या निवडणुका अगदी काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत.त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे,असा निशाणा उद्धव ठाकरे यांनी सामानातून भाजपवर साधला आहे.