अमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण

टीम महाराष्ट्र देशा : संपत्ती मिळवण्यासाठी आईला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. आपल्या जन्मदात्या आईला मारहाण करणारी व्यक्ती हि पालघरमधील शिवसेना नगरसेवक मकरंद पाटील आहे. दरम्यान, मारहाण प्रकरणी पाटील आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असणाऱ्या पाटील यांच्या पत्नी श्वेता पाटील यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरसेवक मकरंद पाटील यांनी आपली आई सुचिता पाटील यांनी स्वकमाईने पालघरमध्ये सदनिका खरेदी केल्या आहेत. या सदनिका मकरंद यांनी कारस्थान करत आपल्या नावे करून घेतल्याची तक्रार सुचिता पाटील यांनी केली आहे. आई जिवंत असताना देखील तिचं मृत्यूपत्रही मकरंद पाटील यांनी बनवून घेतल्याचा आरोप आहे.

दरम्यान, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी मकरंद पाटील यांना राष्ट्रवादीमधून सेनेत प्रवेश दिला होता. तसेच पाटील यांच्या पत्नी श्वेता पाटील या पालघर नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत.Loading…
Loading...