अधिकाऱ्याला हटवण्यासाठी नगरसेविकेने दिली आत्महत्येची धमकी, सभागृहाच्या भिंतीवरच आपटले डोके

टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबाद महापालिकेच्या सभा गृहात बुधवारी सर्वत्र गोंधळ पाहिला मिळाला. शिवसेनेच्या नगरसेविका मीना गायके यांनी आत्महत्येची धमकी देत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृहाच्या भिंतीवर डोके आपटून घेतले. मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांच्याविरुद्ध तत्काळ निलंबनाची कारवाई करा अन्यथा आत्महत्या करेल अशी धमकी गायके यांनी दिली. या साऱ्या प्रकारामुळे सभागृहात चांगलाचं गोंधळ उडाला.

वॉर्डातील कामांचे बिल काढण्यासाठी टाळाटाळ तसेच उद्दामपणाची भाषा करणाऱ्या मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे करत आहेत, असे मीना गायके यांचे म्हणणे होते. त्यामुळे लवकरात लवकर केंद्रे यांचे निलंबन करावे अशी मागणी मीना गायके यांनी केली. यावर मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांना पालिका सेवेतून मुक्त करण्याचे आदेश महापौरांनी दिले. तर केंद्रेनी सभा गृहाच्या बाहेर जावे असा आदेश महापौरांनी दिला.

दरम्यान केंद्रे बाहेर जाण्यास निघताच गायके यांनी त्यांचा रस्ता अडवून सभागृहाच्या भिंतीवर स्वत:चे डोके आपटले. यानंतरही त्यांना गहिवरून आले होते. संताप अनावर झाल्याने गायकेंना भोवळ येऊन त्या जमिनीवर कोसळल्या. त्यामुळे सर्वांचीच धांदल उडाली. थोड्या वेळाने त्यांना खासगी रुग्णालयात हलवले.