भाजपने गोडं बोलून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा :- राज्यात सत्ता संघर्षाचे सत्र अद्याप सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यामांशी संवाद साधत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या टिकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपने केलेले आरोप खोडून काढले आहेत.

ते म्हणाले की, काळजी वाहू मुख्यमंत्र्यांची काळजी वाटली. आम्ही बरोबर नसतो तर भाजपला अचाट विकास करता आला असता का ? हा आमचा प्रश्न आहे. आम्ही जनतेच्या हिताचे प्रश्न मांडले. सरकारमध्ये असताना न्याय मिळवून देत आलो. जनतेचा शिवसेनच्या शब्दावर विश्वास आहे. माझ्यावर शिवसेनेवर पहिल्यांदा खोटारडेपणाचा आरोप केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर अमित शहांची मदत घेऊन आरोप केले. उपमुख्यमंत्री पदासाठी आम्ही लाचार झालो नाही. त्यानंतर पुन्हा चर्चा झाली. त्या चर्चेत आम्ही सम समान वाटपाचा मुद्दा मांडला. त्यावेळी समसमान वाटपाचा मुद्दा त्यांनी मान्य केला.भाजपने गोड बोलून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस चांगले मित्र त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी चर्चा थांबवली आहे. मला मान्य आहे. पण तुम्ही शब्द पाळला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच,मी दिल्लीला गेलो नाही, अमित शहा आणि फडणवीस आमच्याकडे आले होते.राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचा व्यक्ती असेल, असे मी बाळासाहेबांना वचन दिले आहे.देवेंद्र फडणवीस होते म्हणून मी 2014 ला पाठींबा दिला. गोडं बोलून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न भाजपने केलाय आहे. मी भाजपला शत्रु मानत नाही, पण भाजपने खोटं बोलू नये असेही ते म्हणाले.