शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरला तापमानाचा फटका! उड्डाण रखडलं

udhav thakare nagar1

अहमदनगर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरला तापमानाचा फटका बसल्यामुळे उद्धव ठाकरे कारने पुण्याला निघाले आहेत. उन्हात बराच वेळ हेलिकॉप्टर थांबल्यानं ते खूपच तापले होते. त्यामुळे हेलिकॉप्टरचं उड्डाण रखडलं आहे.

शिवसैनिक हत्याकांड : मुख्यमंत्र्यांनी स्वत:चा अधिकार वापरून आरोपींना फासावर लटकावे

Loading...

अहमदनरमधील शिवसैनिकांच्या हत्येवर संताप व्यक्त करताना महाराष्ट्राची कायदाव्यवस्था बिहारपेक्षा वाईट असून नामर्दाच्या अवलादीला ठेचून काढू असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच ठुबे आणि कोतकरांचे मारेकरी कोणीही असो, कोणत्याही पक्षाचे असो, अगदी सत्ताधारी पक्षातील असले तरी त्यांना पाठिशी घालता कामा नये. मुख्यमंत्र्यांनी स्वत:चा अधिकार वापरून आरोपींना फासावर लटकावलेच पाहिजे अस सुधा उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे अहमदनदरच्या दौऱ्यावर असून त्यांना हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबियांची भेट घेतली. शिवसेनेकडून कुटुंबियांना प्रत्येकी १५ लाख ५० हजाराची आर्थिक मदतही देण्यात आली आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी हत्येवर संताप व्यक्त करताना महाराष्ट्राला वेगळा गृहमंत्री पाहिजे अशी मागणी केली आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कोतकर व ठुबे कुटुंबीयांना भेट दिली. काहीदिवसांपूर्वी शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे या शिवसैनिकांची केडगाव येथे निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. दोषींना लवकरात लवकर शिक्षा करण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले.

७ एप्रिल रोजी केडगाव येथील शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या घालून व गळा चिरून हत्या करण्यात आली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप, आ. संग्राम जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, काँग्रेसचे नगरसेवक विशाल कोतकर यांच्यासह ३० जणांविरूध्द गुन्हा दाखल असून आ. संग्राम जगताप यांना पोलिसांनी अटक केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

– उज्ज्वल निकम यांनी ही केस घ्यावी अशी कुटुंबियांची इच्छा असून आपण त्यांना संपर्क करुन विनंती केली आहे.

– देवेंद्र फडणवीस सरकार निकम्मं आहे.

– उद्या वेळ आली आणि कायदा हातात घेऊन प्रतिकार करावा लागला तर शिवसेना रस्त्यावर उतरेल.

– आमदार कार्डिले यांना गांभीर्याने अटक करणं गरजेचं होतं. अटक झाली मात्र त्यांना लगेच जामीन मिळाला.

– गुंडाना पक्षात घ्या आणि सत्ता स्थापन करा असा मूलमंत्र घेऊन सत्ता स्थापन केली असेल तर या देशाला अच्छे दिन येतील असं वाटत नाही .

– शिवसेनेच्या मंत्र्यांना सरकारमध्ये अधिकार नसल्याचं सांगण्यात येतं. पण आमच्या मंत्र्यांनी अधिकार दाखवायला सुरुवात केली तर त्यांच्या अधिकारांवर प्रश्न उपस्थित करू नका.

– या हत्याकांडानंतर नगरमध्ये दहशत निर्माण केली जात आहे. लोकांवर दबाव टाकला जात आहे. असंच जर होत असेल तर शिवसैनिकांना नगरमध्ये ठाण मांडून बसावे लागेल. इथली गुंडगिरी मोडून काढावी लागेल, असं सांगतानाच कृष्ण प्रकाश सारख्या अधिकाऱ्याकडे अहमदनगरची जबाबदारी सोपविण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.

– ठुबे आणि कोतकरांचे मारेकरी कोणीही असो, कोणत्याही पक्षाचे असो, अगदी सत्ताधारी पक्षातील असले तरी त्यांना पाठिशी घालता कामा नये. मुख्यमंत्र्यांनी स्वत:चा अधिकार वापरून आरोपींना फासावर लटकावलेच पाहिजे

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार