तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले असते- देवेंद्र फडणवीस

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. दरम्यान या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर शाब्दिक फटकेबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले शिवसेनेने २०१४ ला १४७ जागा लढवल्या असत्या तर आज दाचित उद्धवजी मुख्यमंत्री झाले असते. त्यांनी मान्य केलं नसतं, तर संजय राऊत तुम्ही देखील मुख्यमंत्री झाला असता. असा टोला लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत सुद्धा युती करण्यासाठी शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपकडून सतत शिवसेनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न होत आहे. संजय राउत यांनी शिवसेनेने स्वबळावर लढण्याची भूमिका स्पष्ट केल्यावर देखील तुम्हाला कसं कळतं की युती होईल, कोणत्या आत्मविश्वासाने सांगता युती होणारच? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना केला यावर मुख्यमंत्री म्हणाले, “मला जी परिस्थिती दिसते, त्यावरुन सांगतो. त्याचं कारण म्हणजे शिवसेनेचे प्रमुख आज उद्धवजी असतील, तरी तो पक्ष बाळासाहेबांच्या विचाराने चालतो. ज्या वेळी या देशातील तथाकथित सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) एकत्र होतील, त्या त्या वेळी या देशातील जे खरे सर्वधर्म समभाव मानणारे खरे हिंदुत्ववादी आहेत, त्यांना एकत्र यावंच लागेल. मला हे माहिती आहे, की ही परिस्थिती आल्यानंतर बाळासाहेबांच्या विचाराने चालणाऱ्या पक्षाजवळ दुसरा पर्याय उरणार नाही”.

म्हणून तोडली २०१४ ला युती

Loading...

“ त्यावेळी शिवसेनेचं म्हणणं होतं आम्हाला १५१ जागा हव्या. आम्ही म्हणत होतो सेनेने १४७ जागा लढाव्या, आम्ही १२७ जागा लढू आणि आपल्या मित्रांना १९ जागा देऊ. पण त्यावेळी शिवसेनेने भूमिका घेतली होती की आम्ही १५१ चा आकडा घोषित केला आहे. आम्ही त्याखाली येणार नाही. याच मुद्द्यावर युती तुटली. त्यावेळी युती तुटली नसती, तर १४७ पैकी तुमचे (शिवसेना) १२० आले असते, आमचे (भाजप) १२७ पैकी १०५ आले असते, कदाचित उद्धवजी मुख्यमंत्री झाले असते. त्यांनी मान्य केलं नसतं, तर तुम्ही देखील (संजय राऊत) मुख्यमंत्री झाला असता”.

1 Comment

Click here to post a comment