उद्धव ठाकरे लोकांना उल्लू बनवतात- नारायण राणे

हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी कोकणातील ग्रीन रिफायनरी प्रकल्प रद्द करुन दाखवावे

रत्नागिरी : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ‘शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे लोकांना उल्लू बनवतात.’अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली. ते त्नागिरीध्ये काल रिफायनरी विरोधी सभा आयोजित केली होती. त्यावेळी नारायण राणे बोलत होते.

नारायण राणे म्हणाले, शिवसेनेचे आमदार खासदार लोकांना उल्लू बनवतात. ‘रत्नागिरीत प्रकल्पाला विरोध असल्याचं सांगायचं आणि तिकडे आतून जमिनींचे व्यवहार करायचे ही शिवसेनेची नीती आहे. हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी कोकणातील प्रकल्प रद्द करुन दाखवावे.’ असं आव्हानही राणेंनी दिलं आहे. सुमारे 3 लाख कोटीचा नियोजित रत्नागिरी-सिंधुदुर्गातील ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला होता. राणे पुढे म्हणाले, ‘मी या सगळ्याकडे राजकारणापलीकडे जाऊन पाहतोय. इथल्या जमिनींवर आलेले हे संकट घालवण्यासाठी सगळ्यांनी मिळून संघर्ष करणे गरजेचे आहे. या संदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ.’कोणाच्या दबावाखाली इथले पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकारी सर्वसामान्य लोकांना त्रास देत असतील तर सहन करुन घेतले जाणार नाही. असाही दम त्यांनी दिला. दरम्यान नारायण राणे यांच्यासह माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे या दोघांनीही आपल्या भाषणात शिवसेनेवर टीका केली.