fbpx

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले वैशाली येडे यांचे अभिनंदन

टीम महाराष्ट्र देशा : ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचा मान मिळालेल्या वैशाली येडे यांनी आपल्या भाषणात शेतकरी,आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाची विदारक स्थिती निर्भयपणे मांडली होती. त्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून शेतकरी विधवांचे प्रश्न, विदारक स्थिती साहित्याच्या व्यासपीठावरून निर्भीडपणे मांडल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले व कसलीही मदत लागली तर शिवसेना भाऊ म्हणून आपल्या सदैव पाठीशी आहे,असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण मागे घेतल्यानंतर मंडळाने हा उद्घाटकपदाचा मान एका सामान्य महिलेला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वैशाली सुधाकर येडे ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी आहे.

वैशाली येडे ह्या कळंब तालुक्यातील राजुर येथील रहिवासी आहेत. त्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात.त्यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून आपल्या भाषणातून निर्भीडपणे शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना हात घातला.त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.
हा संवाद महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी घडवून आणला असून त्यांनीही भाऊ म्हणून सर्वतोपरी मदत करण्याचा विश्वास दिला.यावेळी ना.संजय राठोड शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, मोहन नंदूरकर आदी उपस्थित होते.