fbpx

शिवसेनेचे उमेदवार बोराटे यांनीच पाठिंबा मागितला होता ; छिंदमने ऐकवली क्लिप

अहमदनगर:  सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपने केलेल्या राजकीय खेळीमुळे शिवसेनेला अहमदनगर महापालिकेच्या सत्तेपासून दूर रहाव लागणार आहे. मात्र, सत्ता सोडू पण शिवद्रोही छिंदमचे मतदान नकोचा निर्णय घेत पक्षाला छिंदमचे मतदान मिळाल्यास ते बाद समजावे असा अर्ज सेनेकडून देण्यात आला होता. दरम्यान, शिवसेनेकडून नकार देवूनही पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्याने सेना नगरसेवकांनी श्रीपाद छिंदमला मारहाण केली. पण आता छिंदम याने पत्रकारांसमोर येत माझ्याकडे अॅडिओ क्लिप असल्याचे सांगत या वादाला वेगळे वळण देत खळबळजनक माहिती समोर आणली आहे.

नेमकं काय म्हणाला श्रीपाद छिंदम ?

“शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांनी मला मतदान करण्याची विनंती केली. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी मला मतदान करण्यास सांगितले. त्या सर्वांचे कॉल रेकॉर्डिग आहे. सभागृहात मतदानावेळी मी बोराटे यांना मतदान करत असताना मला रोखण्यात आले. माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. हात उचलणारे नगरसेवक पळकुटे आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहे. शिवसेनेकडून माझ्या जिवितास धोका आहे.”