fbpx

भाजपच्या विमानतळ भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार

Shivsena-BJP

नवी मुंबई: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूमिपूजन होणार आहे. मात्र शिवसेनेचे स्थानिक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींची नावेच या निमंत्रण पत्रिकेतून वगळून टाकली असून त्यांना साधे आमंत्रण देण्यात आले नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे नेते नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहेत.

विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठीच भाजपने हे डर्टी पॉलिटिक्स केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे शिवसैनिक या पक्षपातीपणाचा कडकडीत निषेध करणार आहेत. उलवा येथे साकारत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी ३ वाजता होणार आहे.

भाजपने निमंत्रण पत्रिकेत शिवसेनेचे स्थानिक खासदार श्रीरंग बारणे, राजन विचारे, आमदार मनोहर भोईर यांची नावे जाणीवपूर्वक छापलेली नाहीत. तसेच या कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही दिले नाही. या अपमानित वागणुकीचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेनेने विमानतळाच्या भूमिपूजनावर बहिष्कार घालण्याचे व निषेध करण्याचे ठरविले आहे.