युतीचं ठरलं! शिवसेना भाजप एकत्रचं लढणार, शहा – फडणवीसांच्या भेटीत शिक्कामोर्तब

blank

टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील सत्ताधारी पक्ष असणाऱ्या भाजप शिवसेनेची युती आगामी विधानसभा निवडणुकीत देखील कायम राहणार असल्याचं निश्चित झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेत चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास चाळीस मिनिटे बैठक झाली. यावेळी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. यावेळी शहा यांनी दोन्ही नेतृत्वाने चर्चा करून लवकर जागा वाटप पूर्ण करण्याची सूचना केली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेनं एकत्र येत लढत दिली होती. त्यामुळे काँग्रेस आघाडीचा दारुण पराभव झाला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत युतीतील दोन्ही पक्षांची ताकद वाढल्याने विधानसभा निवडणुकीत 2014 ची पुनरावृत्ती होणार असल्याचे बोलले जात होते. परंतु भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना शिवसेनेला सोबत घेण्याची सूचना केली आहे.

लोकसभा निवडणुकीत जागावाटप करत असताना भाजप शिवसेनेत जागांचे समान वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं होतं. युतीतील घटक पक्षांचे आधी जागावाटप करून उरलेल्या जागांमध्ये दोन्ही पक्षांत वाटप निश्चित झाले होते. मात्र विधानसभेत सध्या भाजपचे 123 संख्याबळ असताना समान वाटप कसे करणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. भाजपमध्ये जोरदार इनकमिंग होत असल्याने देखील युतीत फूट पडणाची शक्यता वर्तविण्यात येत होती.

दरम्यान, आता शहा आणि फडणवीस यांच्या भेटीनंतर भाजप शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या