fbpx

शिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे

dhananjay munde

ठाणे : शिवसेना आणि भाजप हे दोघे गेल्या साडेचार वर्षांपासून केंद्र, राज्य आणि पालिकांमध्ये एकत्र नांदत आहेत. मात्र हे दोघेही चौकातल्या कुत्र्यांसारखं एकमेकांशी भांडत राहतात, अशी टीका विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना-भाजपवर केली आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी-काँग्रेस परिवर्तन निर्धार यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधत आहे. यावेळी अबंरनाथ येथे मुंडे बोलत होते.

दात आणि नखं काढलेल्या खेळण्यासारखी सध्या महाराष्ट्रातील एका वाघाची अवस्था झालेली पाहवयास मिळत आहे, असं म्हणत शिवसेनेचं नाव न घेता मुंडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

या यात्रेतून शिवसेना मुंडे म्हणले की, भाजप-शिवसेना हे सतत चौकातल्या कुत्र्यांसारखं एकमेकांशी भांडत राहतात.