fbpx

शिवसेना – भाजपची युती, तरीही शिवसेनेची भाजपावर टोलेबाजी

टीम महाराष्ट्र देशा – लोकसभा आणि विधान सभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजपने युती झाली असली तरी शिवसेनेची भाजपावर टोलेबाजी सुरूच आहे. शिवसेनेचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष अशोक सरकार यांनी भाजपला टोला लगावला आहे. राज्यातील भाजप तृणमूलयुक्त असल्याचा टोला अशोक सरकार यांनी लगावला आहे.

अशोक सरकार म्हणाले, ‘ तृणमूलचे नेते भाजपात दाखल झाले आहेत. मुकूल राय, संकूदेब पांडा यांची सीबीआयकडून चौकशीदेखील झाली आहे. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. तसेच हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

भाजपा हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे सत्तेत आली. मात्र आता त्यांना त्याच विषयाचा विसर पडल्याची टीका सरकार यांनी केली. ‘त्यांना आता हिंदुत्वाशी काहीही देणंघेणं नाही. त्यामुळे बंगालमध्ये आमचा लढा हिंदुत्व वाचवण्यासाठी आहे. यासाठी आम्ही राज्यात भाजपा आणि तृणमूलविरोधात लढणार आहोत,’ असं सरकार म्हणाले. तसेच मोदी सर्वात वाईट पंतप्रधान असल्याचं म्हणत ममता बॅनर्जींनी ग्रामीण भागात काही चांगली कामं केल्याचं सरकार यांनी सांगितलं.

दरम्यान,  पश्चिम बंगाल मध्ये शिवसेना स्वबळावर लढणार आहे. पश्चिम बंगालमधील ४२ जागांपैकी १५ जागांवर शिवसेना स्वबळावर लढणार आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याची शिवसेनेची पहिलीच वेळ आहे नाही. विशेष म्हणजे शिवसेना ज्या जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्या सर्व जागांवर हिंदू उमेदवारच दिले जाणार आहेत.