औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघावर अखेर शिवसेना भाजप युतीचा झेंडा फडकला आहे. अब्दुल सत्तार(Abdul Sattar) आणि हरिभाऊ बागडे(Haribhaou Bagde) गटाने याठिकाणी विजय मिळवला आहे. १४ पैकी १४ जागा जिंकत शिवसेना भाजप याठिकाणी विजयी ठरले आहेत. त्यामुळे राज्य जरी महा विकास आघाडीची सत्ता असली तरी दूध उत्पादक संघात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यशस्वीपणे शिवसेना-भाजप समेट घडवून आणला आहे. सध्या शिवसेना-भाजप युतीच्या या विजयाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेतली होती. त्यावेळी भाजप-शिवसेना युती चा पूल नितीन गडकरीच बांधू शकतात असे विधान त्यांनी केले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर राजकारण पेटले होते. चंद्रकांत खैरे पासून ते थेट संजय राऊत यांनी देखील सत्तार यांच्यावर टीका केली होती. मात्र जी युती राज्यात होऊ शकत नाही ती सेना-भाजप युती सत्तारांनी औरंगाबाद जिल्हा दूध संघात घडवून आणली आहे.
अब्दुल सत्तार यांनी भाजपला सोबत घेऊन दूध संघावर सत्ता आणली आहे. औरंगाबाद तालुका मतदारसंघातून भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे सुरेश पठाडे यांचा अर्ज कायम राहिल्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जात होती. हरिभाऊ बागडे यांचा यात विजय झाला आहे. चौदाही जागा जिंकत शिवसेना आणि भाजपने या ठिकाणी आपली सत्ता आणली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
“जे आपल्या उमेदवारांवर विश्वास टाकू शकत नाहीत त्यांच्यावर जनता कसा विश्वास टाकणार?”
“आर.आर.आबांच्या स्वप्नांना तिलांजली”, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवरून चित्रा वाघ आक्रमक
Oscar 2022 : सुर्याचा ‘जय भीम’ आणि मोहनलालचा ‘मरक्कर’ या वर्षीच्या ऑस्करच्या यादीत
पर्रीकरानंतर भाजपच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांनी केली अपक्ष लढण्याची घोषणा
“विचार आणि उच्चारांत सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले नेते बाळासाहेब ठाकरे”