औरंगाबादेत शिवसेनेतर्फे निमंत्रितांच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना औरंगाबाद शाखेच्या वतीने निमंत्रितांच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून 29 व 30 जानेवारी रोजी टीव्ही सेंटर मैदान, हडको औरंगाबाद या ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत.

पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार मनीषा कायंदे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार उदयसिंह राजपूत, आमदार रमेश बोरणारे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी कळवले आहे.

सकाळी १०.०० वाजता सुरू होणाऱ्या या कबड्डी स्पर्धेमध्ये 70 किलो वजनी गटातील संभाजीनगर जिल्ह्यातील निमंत्रित संघच खेळतील प्रवेशिका फाईल तयार करून आणणाऱ्या संघासच प्रवेश दिला जाणार आहे तसेच स्पर्धेत गणवेश , प्रशिक्षक व व्यवस्थापक असणे अनिवार्य आहे त्याचप्रमाणे स्पर्धा दोन दिवसाची असल्यामुळे विजेत्या संघांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली जाणार असून काही व्यत्यय आल्यास तांत्रिक समितीचा निर्णय अंतिम राहील, असे आयोजक आ. अंबादास दानवे यांनी कळविले आहे.

महत्वाच्या बातम्या