शिवसेना आणि वडापावचं नातं…!

blank

मुंबई: महाराष्ट्रात कुठेही गेला आणि तिथे ‘वडापाव’ नाही हे शक्यच नाही. या वडापावाची ख्याती साता-समुद्रापार देखील प्रसिद्ध आहे. त्याला महाराष्ट्राचा बर्गर असेही म्हणता येईल. तर, सर्वसामान्यांना परवडणारा आणि पोटाच्या भुकेला शांत करनारा वडापाव नेमका कुठून आणि कसा आला हे ठावूक आहे कोणाला?  या वडापावचा इतिहास काय आहे चला बघू.

१९६६ साली दादर स्टेशन बाहेर अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला असं मानलं जातं. १९६० सालापासून,  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तरुणांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करत होते. ज्या प्रकारे दक्षिण भारतीयांनी त्यांचे हॉटेल्स आणि रेस्टोरेंट्स उघडलेत तसेच तुम्हीही व्यवसायामध्ये प्रगती करा असे, बाळासाहेब वारंवार सांगायचे. बाळासाहेबांच्या ह्या प्रोत्साहनाने अशोक वैद्य यांनी १९६६ साली, परेल आणि वरळी च्या भागात आपला वडा आणि पोह्यांचा एक स्टॉल टाकला.

अंशकालीन उमेदवारांना कंत्राटी स्वरुपात तत्काळ नेमणूका द्या – बच्चू कडू

त्यांनी एक वडा , पावच्या मध्ये टाकून आणि थोडी चटणी लावून प्रयोग  करून पाहला.हाच प्रयत्न नंतर वडापावच्या नावाने प्रसिद्ध झाला तो फक्त मुंबईतचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात, देशात, जगभरात! १९७०-८० च्या काळात खूप संप आणि राजकीय आंदोलनं घडत होती तसेच यांत्रिकी करणामुळे अनेक कापड गिरण्या व कंपन्या बंद पडू लागल्या होत्या.

BSNLचा जबरदस्त प्लान; रोज २२ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग

अनेक कामगारांचा रोजगार या काळात गेला होता. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न त्यांना भेडसावत होता. परिणामी अनेक कामगारांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे वडा पावचे स्टॉल्स उघडले. खरंतर वडापाव बनवायला सोप्पा, त्याला लागणाऱ्या सामग्री पण सहज उपलब्ध होणारी आणि सर्वसामन्यांना परवडणारा हा खाद्यपदार्थ. त्यामुळे अल्पावधीत वडापाव ने प्रसिध्दी गाठली.

आ. नाईक कोरोनाच्या विळख्यात ;निलेश राणे म्हणाले,रेड्याला कोरोना होऊ शकतो?

एवढेच नव्हे तर बाळासाहेब ठाकरे हे वडपावचे निर्माते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक वैद्यांच्या वडापावाचे चाहते आणि नेहमीचे कस्टमर होते. त्यांचं हे नातं घट्ट बनत मैत्रीत रूपांतरित झालेलं. वैद्यांना कोण‌त्याच  खटल्यात त्रास होता कामा नये, असे आदेश ही बळा साहेबांनी त्यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले होते. आजही हा वडापाव लाखो लोकांची भूक भागवतो, मग ते खाणारे ग्राहक असो वा वडापाव विक्री करून उदरनिर्वाह करणारे उद्योजक!

तर असा हा मराठमोळा वडापाव हा म्हणजे मुंबईकरांच्या जीवनाचा भाग बनला. अनेक गिरणी कामगार हे शिवसैनिक झाले आणि त्यांनी सुरु केलेला शिववडापाव हा आजही वेगळ्या व खास चवीसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात गावोगावी वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जाणारा हा वडापाव तेथील खासियतच आहे.