मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल अयोध्या दौरा करणार असल्याचं जाहीर केलं. त्याआधी शिवसेनेचे नेतेही अयोध्येला जाणार असल्याची माहिती मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली होती. त्यावरून आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया देत राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
आम्ही फक्त राजकारणापुरतं अयोध्येला जात नाही तर शिवसेना आणि अयोध्याचं पूर्वीपासूनच भावनिक नातं आहे, असे ते यावेळी म्हणाले.