एनडीएच्या बैठकीला शिवसेना अनुपस्थित? संबंध बिघडल्यानंतर भाजपकडून बैठकीचे निमंत्रण नाही

blank

टीम महाराष्ट्र देशा : सत्ता संघर्ष शिगेला पोहचल्याने भाजप शिवसेनेच्या संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम दिल्लीत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात होणार असल्याच दिसत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. याआधी रविवारी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक बोलवण्यात आली आहे. मात्र या बैठकीला शिवसेना अनुपस्थित राहणार असल्याचं दिसत आहे.

मुख्यमंत्रिपदावरून निर्मण झालेल्या वादानंतर शिवसेना आणि भाजपामधील संबंध जवळपास संपुष्टात आले आहेत. अधिकृत घोषणा झाली नसली तरी शिवसेनाभाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडल्यात जमा आहे. त्यामुळेच हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावण्यात आलेल्या एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीला शिवसेना अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.

हिवाळी अधिवेशनासंदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या घटकपक्षांची बैठक रविवारी संध्याकाळी बोलावण्यात आली आहे. मात्र राज्यात सत्तास्थापनेवरून झालेल्या वादानंतर शिवसेना भाजपापासून दुरावली आहे. त्यामुळे संबंध बिघडल्यानंतर शिवसेनेला एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही, अशीही माहिती समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या