Monday - 27th June 2022 - 8:06 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

Shiv Sainik on Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या पत्राला शिवसैनिकाचे कणखर प्रत्युत्तर

by Sandip Kapde
Friday - 24th June 2022 - 1:32 PM
Shiv Sainik on Sanjay Shirsat संजय शिरसाट यांच्या पत्राला शिवसैनिकाचे कणखर प्रत्युत्तर संजय शिरसाट यांच्या पत्राला शिवसैनिकाचे कणखर प्रत्युत्तर

Shiv Sainik on Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या पत्राला शिवसैनिकाचे कणखर प्रत्युत्तर

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार अस्थिर झालं आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी लाईव्ह येत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर आज बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. संजय शिरसाट यांच्या या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी अनेक गंभीर आरोप पत्रात केले आहेत. या पत्राला आता शिवसैनिकांनी उत्तर दिलं आहे.

शिवसैनिकांचे पत्र

प्रिय,

संजय शिरसाट जी…

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपण लिहिलेल्या पत्राबाबत आपल्याच मतदार संघातील एका शिवसैनिकाच्या भावना..

आमचे वडील सांगतात आपण सक्रिय राजकारणात येण्या आधी रिक्षा चालक होता आणि आपणही हे अनेक वेळा जाहीररित्या बोलून दाखवले आहे. संभाजीनगर स्थानिक शिवसेना नेत्यांवर विश्वास ठेऊन आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला पक्षाच्या, लोकप्रतिनिधी पदाच्या अनेक जबाबदाऱ्या दिल्या आणि आपण सर्वसाधारण रिक्षावालापासून ३ वेळेस आमदार झालात.

शिरसाट जी हेच नाही तर आपण आपल्या मुलालाही आमची इच्छा नसताना आमच्यावर लादले त्याचा भयानक त्रास सहन करूनही आम्ही मेहेनत करून जनतेच्या साथीने त्यालाही लायकी नसताना निवडणूक दिले.
हे सगळं फक्त शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांच्या प्रेमाखातर…

संजय शिरसाट म्हणजे आमच्यासाठी फक्त शिवसेनेने दाखवलेला दगड…
याचा प्रत्यय तुम्हाला २०१९ सालच्या निवडणुकीत आला आहे.
संजय शिरसाट या नावाला जनतेचा प्रचंड विरोध होता. जनतेचाच काय तुमच्या जिवाभावाच्या सहकाऱ्यांनी सुद्धा आपली साथ सोडली होती.
त्यासाठी पण अनेक कारणं होती. जेव्हा तुमच्या विरोधात सगळे उभे होते आता तुम्ही ज्यांच्या सोबत So called हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सोबत जाणार आहात त्या भाजपने राजू शिंदे नावाचा भाजपचा माजी उपमहापौर आपल्या विरोधात उभा केला देवेंद्र फडणवीस स्वतः राजू शिंदेच्या संपर्कात होते.
पैशांचा मोठा बाजार झाला अनेक दिग्गज मंडळीनी आपल्याला पाडण्यासाठी कंबर कसली होती.
तुमच्याच जवळच्या सहकाऱ्यांनी सांगितले की आपणही निवडणूक काळात अनेक वेळा “रात्रीच्या” वेळी रडलात, हतबल झालात!

अगदी निकालाच्या आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही विजयाची आशा सोडली होती.
पण निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी झालेला चमत्कार आपल्यासाठी सुद्धा आश्चर्यकारक होता याचे आम्ही सगळे शिवसैनिक साक्षीदार आहोत.
तो सर्व चमत्कार फक्त आणि फक्त आपल्याला शिवसेनेचा दगड समजून केलेल्या शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे.
शिवाजीनगर, पदमपुरा अशा अनेक भागातून आपल्याला लीड मिळालेली मत ही शिवसेनेची होती; संजय शिरसाटची नाही, हे संभाजीनगर पश्चिममधील प्रत्येक मतदार, शिवसैनिक सांगू शकतो.

असो बोलण्यासारखं खूप काही आहे…
तुम्ही उद्धवसाहेब भेटत नाही म्हणता. काल त्यांनी, ते का भेटत नव्हते हे सांगितले.

तुम्ही मतदारांना न भेटता अनेक “रात्री” मुंबईला कुठे घालवता याची कल्पना सर्वांना आहे..
आपले अनेक कारनामे शिवसैनिकांनी पाठीशी घातले फक्त आणि फक्त शिवसेनेच्या आपुलकी पोटी.
आमच्या जीवावर तुम्ही निवडून आलात.
तर अमाच्याही भावना ऐकून घ्या.
आम्ही शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय यांच्या सोबत आहोत आणि सदैव राहणार…

अजून जे काही मनात आहे ते येणाऱ्या निवडणुकीत बोलू.

लोभ असावा…

शिवसैनिक पदमपुरा,

संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ

शिवसेना आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

शिवसेना आमदार संजय सिरसाट यांनी उद्धव यांना लिहिलेल्या पत्रात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी लिहिले आहे की, आमच्या समस्या फक्त एकनाथ शिंदे ऐकत असत. वर्षा बंगल्यावर पहिल्यांदाच लोकांची गर्दी पाहून आनंद झाला. गेली अडीच वर्षे आम्हाला प्रवेश मिळत नव्हता. या बंगल्यात प्रवेश करण्यासाठी आपल्या जवळच्या लोकांना नवस करावा लागला. तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला राज्यसभा निवडणुकीपासून दूर ठेवले. आम्हाला अपमानास्पद वागणूक मिळाली. आम्हाला काही अडचण असेल तर आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचे होते पण आम्हाला वर्षा निवास येथे बोलावून अनेक तास रस्त्यावर उभे केले जायचे. आमचा फोनही कोणी घेत नव्हत. हे सर्व आमदारांनी सहन केले आहे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगण्याचा आम्ही अनेकदा प्रयत्न केला. या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या नसतील, मी सहमत आहे. पण आमचा अपमान होत असताना आम्हाला हे सांगायचे होते. एकनाथ शिंदे आमचे सर्व बोलणे ऐकत असत. आम्ही सर्व न्यायासाठी एकत्र आलो आहोत.

महत्वाच्या बातम्या :

  • संजय शिरसाट यांच्या पत्राला शिवसैनिकाचे कणखर प्रत्युत्तर
  • Tejaswini Pandit : सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तेजस्विनीने शेअर केला ‘रानबाजार’चा ‘तो’ सीन
  • shiv sena : “शिवसेनेच्या समुद्रातून गेलेले मासे तडफडून मरतील” ; शिवसैनिकाची प्रतिक्रिया
  • Ranji Trophy 2022 Final : मुंबईच्या सरफराज खानचं पुन्हा शतक..! गायक मुसेवालाला दिली श्रद्धांजली; पाहा VIDEO
  • Sanjay Raut : “महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे पण…” ; संजय राऊत याचं मोठ विधान

ताज्या बातम्या

Aditya Thackerays reaction to Sanjay Rauts ED notice संजय शिरसाट यांच्या पत्राला शिवसैनिकाचे कणखर प्रत्युत्तर
Editor Choice

Aditya Thackeray : राजकारणाची आता सर्कस झालीये; राऊतांच्या ईडी नोटिसीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aditya Thackerays reaction after the Supreme Court decision संजय शिरसाट यांच्या पत्राला शिवसैनिकाचे कणखर प्रत्युत्तर
Editor Choice

Aditya Thackeray : “पळून जाणारे जिंकत नाहीत”; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

maharashtrawillremainunchangedtillnext12dayslawyerudaywarunjikar संजय शिरसाट यांच्या पत्राला शिवसैनिकाचे कणखर प्रत्युत्तर
Editor Choice

Maharashtra political crisis : पुढच्या १२ तारखेपर्यंत महाराष्ट्र अधांतरी राहील – कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर

Ranbir had revealed Alias pregnancy 3 days ago see VIDEO संजय शिरसाट यांच्या पत्राला शिवसैनिकाचे कणखर प्रत्युत्तर
Entertainment

Alia- Ranbir : रणबीरने 3 दिवसांपूर्वीचं केला होता आलियाच्या प्रेग्नेंसीचा खुलासा, पाहा VIDEO

महत्वाच्या बातम्या

Aditya Thackeray's reaction to Sanjay Raut's ED notice
Editor Choice

Aditya Thackeray : राजकारणाची आता सर्कस झालीये; राऊतांच्या ईडी नोटिसीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aditya Thackeray's reaction after the Supreme Court decision
Editor Choice

Aditya Thackeray : “पळून जाणारे जिंकत नाहीत”; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

maharashtra-will-remain-unchanged-till-next-12-days-lawyer-uday-warunjikar
Editor Choice

Maharashtra political crisis : पुढच्या १२ तारखेपर्यंत महाराष्ट्र अधांतरी राहील – कायदेतज्ज्ञ उदय वारुंजीकर

Ranbir had revealed Alia's pregnancy 3 days ago, see VIDEO
Entertainment

Alia- Ranbir : रणबीरने 3 दिवसांपूर्वीचं केला होता आलियाच्या प्रेग्नेंसीचा खुलासा, पाहा VIDEO

BJP-Sena government to come in Maharashtra; Deepak Kesarkara
Editor Choice

Deepak Kesarkar : महाराष्ट्रात लवकरच भाजप-सेनेचं सरकार येणार; दीपक केसरकरांच सूचक वक्तव्य

Most Popular

We are Balasaheb's real Shiv Sena - Eknath Shinde
Editor Choice

Eknath Shinde vs Arvind Sawant : धमक्यांना भीक घालत नाही, आम्हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना – एकनाथ शिंदे

Shiv Sena MP Bhavana Gawli supports Eknath Shinde Letter to Uddhav Thackeray
Editor Choice

Bhavna Gawali : “पक्षातील मावळे आमदार हिंदुत्वाच्या मुद्यावर…” ; भावना गवळींचे उद्धव ठाकरेंना पत्र

IND vs IRE first t20 Bhuvneshwar Kumar Bowling at 208 kmph?
cricket

IND vs IRE : 208 KMPH…! भारताचा भुवनेश्वर कुमार बनला जगातील सर्वात वेगवान गोलंदाज?

Uddhav Thackeray VS Devendra Fadnavis
Maharashtra

Uddhav Thackeray VS Devendra Fadnavis : यंदाचा विठ्ठल पूजेचा मान कोणाला?; चर्चांना उधान

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA