ठाण्यात महाराष्ट्र बंद दरम्यान शिवसैनिकांची रिक्षा चालकास मारहाण; पाच जणांवर गुन्हा

रिक्षाचालकास मारहाण

ठाणे : कालच्या महाराष्ट्र बंद दरम्यान बंदला प्रतिसाद न दिल्याने शिवसैनिकांनी एका रिक्षाचालकास मारहाण केली आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आला असून त्यानुसार ठाण्याच्या उपमहापौरासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडलेल्या घटनेचा निषेधार्थ काल आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद पुकारला होता. उपमहापौराचे पती माजी नगरसेवक पवन कदम दमदाटी करताना दिसत आहेत. तर माजी नगरसेवक गिरीश राजे यांनी त्या रिक्षाचालकाला मारहाण केल्याचे दिसत आहे. तर किरण नाक्ती, प्रकाश पायरे, महेंद्र मढवी हे सुद्धा व्हिडीओत दिसत आहेत. रिक्षाचालकाला धमकावून मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्र बंद दरम्यान सदरील कार्यकर्ते हातात काठी घेऊन येणाऱ्या रिक्षावर वार करताना व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत:हून याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान याबाबत महापौर नरेश म्हस्के यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

यावर आता विरोधकांतून टीका होत आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, शरद पवारांनी सोलापूरात बोलताना बंद शांततेत, संयमाने पार पाडण्याचे आवाहन केले होते. पण या सरकारमधील तिनही पक्षात ताळमेळ नाही. आपल्याच नेत्याच्या आवाहनाला हरताळ फासण्याचे काम सुरु आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

महत्वाच्या बातम्या