पुणे : पुण्यातील कात्रज येथे एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गटामध्ये मोठा गदारोळ निर्माण झाला. पुण्यात या दोन्ही गटातील वाद शिगेला पोहचला. बंडखोर नेते उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी कात्रज येथे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जाहीर सभांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, युवासेनेचे प्रमुख आदीच्या ठाकरे यांनी एकमेकांवर नाव न घेता परस्परांवर टीका केली. तानाजी सावंत यांनी थेट कोण आदित्य ठाकरे? असा प्रश्न केल्याने या दोन्ही गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. दरम्यान, कात्रज येथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा सुरू होती. यावेळी माजी शिक्षण मंत्री व शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाड्यांचा ताफा तेथून जात होता. सिग्नलला सामंतांची गाडी थांबली असता, शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सामंतांच्या गाडीच्या काचाही फुटल्या होत्या. याप्रकरणी आता कोणती कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
उदय सामंत यांच्या वाहनावरील हल्ल्याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली असून १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणानंतर उदय सामंत यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शिवसैनिकांवरील या कारवाईमध्ये पुण्यातील मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. पुण्यातील ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली. मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सभेचे मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रूपेश पवार यांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय इतर १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
If today Maharashtra has State or Municipal elections the Eknath Shinde – BJP combine would lose heavily .
Uday Samant Shinde camp MLA car being attacked by people who are annoyed with them for betraying Uddhav Thackeray. pic.twitter.com/gDAPB71bv0
— Ravinder Kapur (@RavinderKapur2) August 3, 2022
शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांची पहिली अटक झाली. दरम्यान, मोरे यांनी ट्विट करत माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे, असे म्हटले आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची पुण्यात दणदणीत, खणखणीत सभा पार पडली. म्हणून सरकारने शिवसैनिकांवर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे, असे ट्विट शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी केले आहे. तसेच आमच्यावर गंभीर आरोप करुन गजानन थरकुडे, संभाजीराव थोरवे, राजेश पळसकर, सुरज लोखंडे, चंदन साळुंखे , विशाल धनवडे, अनिकेत घुले, रुपेश पवार आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यावर भारती विद्यापीठ स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिली.
शिवसेना नेते मा आदित्यसाहेब ठाकरे यांची पुण्यात दणदणीत, खणखणीत सभा पार पडली. म्हणून सरकारने शिवसैनिकांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. @uddhavthackeray@AUThackeray @AhirsachinAhir
— Sanjay More Pune (@SanjayMore9797) August 2, 2022
गाडीवरील हल्लाप्रकरणी सामंत यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा हल्ला पूर्वनियोजित होता. अशा भ्याड हल्ल्याला आपण घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. पोलिसांनी या हल्लेखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या :
- CWG 2022 : पीव्ही सिंधूच्या नेतृत्वातील बॅडमिंटन संघाने जिंकले ‘सिल्वर मेडल’; वाचा सविस्तर!
- VIDEO – माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केला
- BREAKING : उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, पुण्यात मोठा गदारोळ
- Partha Chatterjee SSC scam | पार्थ चॅटर्जीवर एका महिलेने फेकली चप्पल; म्हणाली, भ्रष्टाचारी माणसाला एसी गाडीतून का आणता?
- Sanjay Raut | संजय राऊतांना अटक झाल्याच्या आनंदात बाळासाहेबांच्या ड्रायव्हरने वाटले पेढे
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<