शिवजन्मोत्सवाच्या अध्यक्षासह सचिवपदी दलित तरूणाची निवड

सोलापूर – कोरेगाव भीमा येथे झालेल्या प्रकारानंतर राज्यातील सामाजिक विण उसवल्याचे दिसत आहे. जाती जातीत भेदाच्या भिंती उभ्या राहिलाचे आपण पाहिले आहे. मात्र, लांबोटी गावातील शिवजन्मोत्सवाच्या अध्यक्षासह सचिवपदी दलित तरूणाची तर उपअध्यक्षपदी धनगर समाजातील तरूणाची निवड करून गावकऱ्यांनी एक वेगळाच संदेश दिला आहे. यामुळे लांबोटीतील शिवतेज शिवजन्मोत्सव तरूण मंडळाचे सगळीकडे कौतुक होत आहे. लांबोटी ( ता. मोहोळ जि. सोलापूर ) येथील शिवतेज शिवजन्मोत्सव तरुण मंडळाच्या वतीने होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या अध्यक्षपदी शरद चंदनशिवे यांची तर उपाध्यक्षपदी अमित पाटील यांची तर सचिव म्हणून सुनिल मिरजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

लांबोटी ग्रामपंचायत सदस्य तथा शिवतेज शिवजन्मोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या राजदीप हाऊस येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत या निवड करण्यात आली. या निवडीबाबत बोलताना ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत जाधव म्हणाले, छत्रपती शिवराय हे बहुजनांचे राजे होते. मात्र काही लोकांनी महाराजांना विशिष्ट जातीत बंद करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे शिवजन्मोत्सव हा सर्व समाजातील लोकांनी एकत्र येत करण्यासाठी अध्यक्षपदी दलित समाजातील व्यक्तींची निवड करण्याची सुचना आमचे मार्गदर्शक व दादा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार ब्रह्मा चट्टे यांनी केली होती. त्यांच्या सुचनेनुसार आज एकमताने या निवडी करण्यात आल्या असून समाजात सामाजिक सलोखा टिकून रहावा म्हणून आम्ही सतत कार्यरत राहणार असल्याचे ग्वाही चंद्रकांत जाधव यांनी दिली.

Loading...

अध्यक्षपदाच्या निवडीनंतर बोलताना नुतन अध्यक्ष शरद चंदनशिवे म्हणाले, शिवजन्मोत्सवाचे अध्यक्षपदाने मी भारावून गेलो आहे. सालाबादप्रमाणे यंदाही शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येईल. शिवजन्मोत्सवाची सुरवात १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. करण्यात येणार असून 25 फेब्रुवारी रोजी सायांकाळी ४ वाजता भव्य मिरवणुकीने सांगता करण्यात येणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
तुम्ही काय केलं ते आधी सांगा;शिवेसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
चव्हाणांच्या गौप्यस्फोटावर खडसे  म्हणतात...
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार
भागवत यांना किती मुलं आहेत हे मला माहित नाही; त्यांनी नसत्या उठाठेव करू नये
मुंबईची माहिती नाही तेच 'नाईट लाईफ'ला विरोध करत आहेत - प्रकाश आंबेडकर