fbpx

बहुजनांच्या विविध संघटना एकत्र साजरी करणार शिवजयंती

सोलापूर : महात्मा फुले यांनी कुळवाडीभूषण म्हणून गौरवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी बहुजनांच्या विविध संघटना एकत्र येणार आहेत. १९ फेब्रुवारी रोजी ३० पेक्षा अधिक संघटना एकत्र येत आहेत. बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून शिवजयंती साजरी होणार आहे. समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावा, यासाठी शिवजयंती उत्सव राज्यभर बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून होणार आहे.

शिवजयंती साजरी करण्यासाठी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, इंडियन लॉयर्स असोसिएशन, भीम आर्मी, भारतीय विद्यार्थी मोर्चा, अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीसह ३० हून अधिक संघटनांचा समावेश असेल. फारूख शेख, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड : छत्रपती शिवाजी महाराज हे एकतेचे प्रतीक असून समाजामध्ये एकता नांदली पाहिजे. त्यामुळे बहुजनांच्या विविध संघटनांकडून एकत्रित शिवजयंती साजरी केली जाणार आहे.

यामध्ये मुस्लिम संघटनाही सहभागी होणार आहेत. बापू मस्के, बामसेफ : भीमा कोरेगाव प्रकरणानंतर समाजामध्ये तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. तो दूर करू एकोपा निर्माण करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यभर शिवजयंती साजरी होणार आहे. मराठा व दलित यांच्यामधील तणाव कमी होण्यास मदत होईल. युवराज पवार, अन्याय-अत्याचार विरोधी कृती समिती शिवजयंतीची सुरुवात महात्मा फुले यांनी केली.

तसेच अण्णा भाऊ साठे यांनी शिवाजी महाराजांचा पराक्रम रशियात जाऊन सांगितला. शिवाजी महाराजांनी लहुजी वस्ताद साळवे यांचे वडील राघोजी साळवे यांना सुभेदार ही पदवी दिली होती. हा इतिहास बहुजनातील तरुणांना कळावा.