या महाविद्यालयात भरवला जातो महाराष्ट्रातील एकमेव ‘शिवचरित्रवर्ग’

अक्षय पोकळे : आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडे, इतिहास फक्त ऐकला असेल पण शिवाजी महाराजांचे चरित्र युवा पिढीसमोर येन तेवढच महत्वाच आहे. आणि या सर्व गोष्टी पुण्यातील एका महाविद्यालयामध्ये शिकायला मिळतात. सर परशुरामभाऊ महाविद्यालय अर्थात एसपी कॉलेज मध्ये ‘शिवचरित्रवर्ग’ भरवले जातात. गेल्या एक वर्षापासून एसपी कॉलेज मध्ये हे वर्ग चालू आहेत. युवा पिढीमध्ये शिवरायांचा इतिहास जाज्वल्य पद्धतीने तरुणांसमोर येण्यासाठी शिवचरित्रवर्ग घेणारे एसपी कॉलेज हे महाराष्ट्रा मधील पहिलेच कॉलेज आहे.

हा वर्ग म्हणजे शिरायांचा प्रज्वलित इतिहास जागृत करण्याबरोबरच शिवाजी कोण होते हे सांगण्यासाठी उचलेल महत्वाच पाउल आहे. विद्यार्थ्यांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल असलेल प्रेम, आदर, आस्था हे सर्व लक्षात घेता मागील एक वर्षापासून एसपी कॉलेज मध्ये हा वर्ग सध्या चालू आहे. विशेष म्हणजे मुलींचा सह्भाग देखील खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवस प्रत्येकी अर्धा तास शिवाजी महाराजांचा इतिहास समजून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. कला, विज्ञान व वाणिज्य या तीनही शाखेचे विद्यार्थी या क्लास मध्ये एकत्र येतात आणि विशेष म्हणजे शैक्षणिक क्लास बुडणार नाहीत या पद्धतीने शिवचरित्र वर्ग भरवले जातात. शिवचरित्र वर्गाला खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थांचा प्रतिसाद असल्याची माहिती एसपी कॉलेजचे प्राचार्य दिलीप शेठ यांनी ‘महाराष्ट्र देशा’ ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

पहा संपूर्ण मुलाखत 

You might also like
Comments
Loading...