मुंबई : कोरोना काळात मजूर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार ठरत आहे. राज्य सरकारने उद्यापासून लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पण यात एक मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधाच्या काळात शिवभोजन मोफत देण्यात येणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
कोरोनाची दुसरी लाट थोपवून लावण्याच्या हेतूने राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर गोरगरिबांच्या पोटाची भूक भागविण्याच्या हेतूने शिवभोजन थाळी पार्सल स्वरुपात मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दहा रुपयांची ही थाळी कोरोना काळात पाच रुपयांना करण्यात आली होती. पण आता गरीब आणि गरजुंना मोफत मिळणार आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. याच पार्श्वूभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे आहे. राज्यात उद्या रात्री 8 वाजेपासून 144 कलम लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आहे. आवश्यक कामाशिवाय कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. पुढीस 15 दिवसांसाठी ही संचारबंदी लागू असणार आहे.
राज्यात ऑक्सिजनची मोठी कमतरता आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी वाहतुकीत मोठा वेळ जात आहे. त्यासाठी लष्कराच्या मदतीने ऑक्सिजनचा पुरवठा हवाई मार्गाने करण्यात यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणार आहे. इतर राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठीही पंतप्रधानांना विनंती करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
- कोरोना उपाययोजनांबाबत केंद्राकडून ठाकरे सरकारवर पुन्हा नाराजी
- NIAच्या IG शुक्लांची तडकाफडकी बदली का केली ?; मुश्रीफांचा सवाल
- …तेव्हा पक्षापेक्षा शेतकरी महत्वाचा असतो; बच्चू कडूंनी सांगितली भारतनानांची आठवण
- पवारांचा रुग्णालयात गुढीपाडवा; अजितदादांनी घेतली भेट, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
- लवकरच मी फिल्डवर ॲक्टिव्ह होईन ; कोरोन संसर्गानंतर आदित्य ठाकरेंचा विश्वास