या देशात रोज संविधान पायदळी तुडवलं जातं; संजय राऊत यांनी व्यक्त केली खंत

या देशात रोज संविधान पायदळी तुडवलं जातं; संजय राऊत यांनी व्यक्त केली खंत

Sanjay Raut

मुंबई: आजचा दिवस म्हणजेच २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस (Constitution Day) म्हणून देशभरात साजरा केला जातो. केंद्र सरकारडून संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज संविधान दिन साजरा केला जाणार आहे. मात्र काँग्रेससहित सर्वच विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. एकेकाळी भाजप सोबत असणारी शिवसेनेने देखील या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या बद्दल पत्रकारांशी बोलताना केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

देशात संविधानाचं राज्य राहिलेलं नाही. हुकूमशाही पद्धतीने काम सुरु आहे. राज्यघटनेतील अनेक कलमं, खासकरुन राज्याचे अधिकार, संघराज्य व्यवस्था तोडली जात आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. संविधान कार्यक्रमावर तृणमूल काँग्रेस (TMC) आणि काँग्रेसने (Congress) बहिष्कार टाकला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं असता संजय राऊत म्हणाले की, मी राष्ट्रवादीविषयी सांगत नाही. विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

या देशात रोज संविधान पायदळी तुडवलं जातं. महाराष्ट्रातसुद्धा संविधानाच्या बाबतीतही राजभवनात काय सुरु आहे हे आपल्याला माहिती आहे. मग संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. संविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ आहे. मात्र गेल्या काही वर्षात हे संविधान पायाखाली तुडवले जात असल्याची खंत संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या: