शिरूरची जागा शिवसेनेची हे मुख्यमंत्र्यांना माहीत नसावे – आढळराव पाटील

पुणे – राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी शिरूरमधून लोकसभा लढवण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. फडणवीस यांनी वळसे पाटलांना शिवसेना की भाजपमधून लढण्याचा सल्ला दिला हे पहावं लागेल. मात्र ही जागा शिवसेनेची आहे हे कदाचित मुख्यमंत्र्यांना माहीत नसावं असा टोला शिरूर चे सेनेचे खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लगावला आहे.

शिरूरचा उमेदवार हीच राष्ट्रवादीपुढची मोठी समस्या आहे. शेवटी मुख्यमंत्र्यांना लक्ष घालून वळसे पाटलांनी निवडणूक लढवावी असे सांगावे लागले. परंतु ही जागा शिवसेनेची आहे हे मुख्यमंत्र्यांना माहित आहे की नाही हा प्रश्न असल्याचं आढळराव पाटील म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकारणात शिरूर लोकसभा मतदारसंघ हा कायम चर्चेचा विषय राहिलेला आहे. आगामी लोकसभा निवडणूक पाहता सर्वच पक्षांनी शिरूर काबीज करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. परंतु राष्ट्रवादीसह भाजपकडे देखील विद्यामान खा आढळराव पाटील यांना तगडी लढत देऊ शकेल असा उमेदवार नाही. 15 वर्षांपासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील खुलेपणे विरोधकांना आपल्या विरोधात लढण्याचे आव्हान देत आलेले आहेत. दरम्यान, मागील आठवड्यात मुख्यमंत्र्यांनीच वळसे पाटील यांनी लोकसभेच्या मैदानात उतरण्याचा सल्ला दिल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या होत्या.

 

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...