शिरूरमध्ये भरदिवसा इसमाला लुटले

शिरूर/ प्रमोद लांडे: पुणे जिल्ह्यातील शिरुर याठिकाणी भर दुपारी गर्दीचा फायदा घेउन एकास लुटल्याची घटना घडली.या प्रकरणी उत्तम गंगाराम कदम यांनी फिर्याद दिली आहे. उत्तम कदम हे शिरुर येथे बचत गटाचे पैसे काढण्यासाठी पत्नीसह शिरुर येथे आले होते.शिरुर मधील स्टेट बॅंकेतुन त्यांनी २१ हजार २०० रुपये रक्कम काढल्यानंतर ते एका पंक्चर दुकानावर दुचाकीचा टायर बसवण्यासाठी थांबले होते.

टायर बदलत असताना रस्त्यावर बुलेट दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात इसमांनी जवळ येऊन श्री लॉज कोठे आहे असे विचारले, या वेळी गर्दीचा फायदा घेउन त्यांच्या खिशातील रोकड हातचलाकीने लंपास केली.यानंतर कदम यांना फसवणुक व रक्कम चोरी गेल्याचे लक्षात येताच त्यांनी शिरुर पोलीस स्टेशनला दोन अज्ञात इसमांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे करत आहे. शिरुर शहरात चो-यांचे प्रमाण वाढले असुन चो-या रोखण्याचे आव्हान पोलीसांपुढे निर्माण झाले आहे.Loading…
Loading...