शिरूरमध्ये महिलेचा विनयभंग; एकास अटक

शिरूर: शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपतीच्या नजीक असलेले दहिवडी याठिकाणी विनयभंग झाल्याचा प्रकार घडला आहे.यासंदर्भात एकाला अटकही करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित महिला ही शेतातुन गवत काढुन घेऊन चालली असताना आरोपी नाथा भिवा पिंगळे(रा.पिंगळे वस्ती,भांबर्डे) याने पीडितेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असता पीडित महिला ही पळून गेली. घरी आल्यानंतर महिला ही घाबरलेल्या अवस्थेत दिसल्याने घरच्यांनी विचारले असता सर्व घटना सांगितली व संध्याकाळी रांजणगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. दरम्यान पोलिसांनी आरोपी नाथा भिवा पिंगळे याला अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात पोलिसांनी भा.द.वि.का.क. अन्वये ३५४,५०४.५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय.अमोल गोरे,फरांदे तपास करीत आहे.

You might also like
Comments
Loading...