fbpx

शिरूरची माळ कोल्हेंच्या गळ्यात , लांडेंंचा पत्ता कट !

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून आता प्रत्येक पक्ष जोरदार तयारी लागला आहे. तर राष्ट्रवादी कडून दुसरी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादी मध्ये मावळ आणि शिरूर या दोन मतदारसंघाच्या उमेदवारीचा प्रश्न निकालात काढला आहे. यावेळी मावळ मधून पार्थ पवार लढणार आहेत तर शिरूर मधून अमोल कोल्हे यांची वर्णी लागली असून विलास लांडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

या निवडणुकीमध्ये मावळ आणि शिरूर हे दोन मतदार संघ चांगलेच चर्चेत राहिले आहेत. या दोन मतदार संघातून राष्ट्रवादी कोणाला संधी देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. पण आज राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादी मध्ये मावळ आणि शिरूर या दोन मतदारसंघाचा तिढा सोडवला आहे.

दरम्यान शिरूर मतदार संघातून राष्ट्रवादी कडून विलास लांडे यांच्या नावावर पक्ष श्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब करण्यात आले होते. पण अमोल कोल्हे यांची लोकप्रियता बघून राष्ट्रवादीने अमोल कोल्हे यांना शिरूर मतदार संघाची जबाबदारी दिली आहे.

शिरूर मतदार संघातून अमोल कोल्हे यांना शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आव्हान असणार आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे गेली १५ वर्ष शिरूर लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत.