शिरूर लोकसभा : राष्ट्रवादीकडून माजी आमदार विलास लांडे मैदानात?

टीम महाराष्ट्र देश – शिरूर लोकसभेला राष्ट्रवादीकडून माजी आमदार विलास लांडे यांनाच मैदानात उतरवल जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र देशाला मिळाली आहे. राष्ट्रवादीकडून सध्या शिरूर लोकसभेलासाठी तीन-चार नावे असली तरीही विलास लांडे यांची उमेदवारी फायनल झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

शिरूर लोकसभेला शिवसेना आणि राष्ट्रवादी-कॉंग्रेस यांच्यासह भाजपचेही प्राबल्य वाढलेले दिसत आहे. शिवसेना-भाजप युती होणार की नाही हा निर्णय अजूनही झालेला नसल्याने शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्ष्यांनी आपल्या आपल्या उमेदवाराची जोरदार तयारी केली आहे.

सध्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार विलास लांडे, देवदत्त निकम यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद आणि माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर पक्षाने आदेश दिला तर माझी लढायची तयारी असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्याने त्यांच्याही नावाची चर्चा आता सुरु झाली आहे. या पाच नावापैकी विलास लांडे यांच्या नावावर पक्ष श्रेष्ठीकडून शिक्कामोर्तब झाले असल्याचे कळते आहे.

मागील तीन निवडणुकांपासून अजय असणाऱ्या शिवाजीराव आढळराव-पाटील यांना रोखणाऱ्या उमेदवाराचा राष्ट्रवादीकडून शोध सुरु होता . भोसरीचे आमदार महेश लांडगे हे गावकीभावकीचा विचार करून लांडे यांना थेट विरोध करणार नाहीत, अशी चर्चा सध्या होताना दिसत आहे. बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम पक्षाकडे लोकसभेची अधिकृतपणे उमेदवारी मागणारे ते सध्या तरी एकमेव आहेत. परंतु आता विलास लांडे यांची उमेदवारी फायनल झाली असल्याची माहिती समोर येत आहे.