शिरूर: सहा गावांमधील ग्रामंपचायत निवडणूक रणधुमाळीला सुरवात

शिरूर: राज्य निवडणूक आयोगाने जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या; तसेच रिक्त जागा असणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुरूप सोमवारी (ता.२३) मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू करण्यात आली. रविवारी (ता. २७ मे) मतदान प्रक्रिया होणार आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार थेट सरपंच पदासह सदस्य पदासाठीच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे. शिरूर तालुक्यातील आण्णापूर , शिरूर ग्रामीण, सरदवाडी , कर्डेलवाडी , तार्डोबाची वाडी , वाजेवाडी या सहा गावांमधील ग्रामंपचातीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे.

शिरूर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंचक्रोशीतील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय रणधुमाळीला सुरवात झाली आहे. तालुक्याचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या समर्थकांमध्ये व राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये सरळ लढत पाहवयास मिळणार आहे.

पंचक्रोशीतील पाच ग्रामपंचायातीसह तालुक्यातील वाजेवाडी येथे निवडणूक पार पडत आहे. सध्या शिरूर पंचक्रोशीतील सर्वच ग्रामपंचायतींवर आमदार पाचर्णे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. दिनांक ७ मे ते १२ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. १४ मे रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून १६ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघे घेण्याची मुदत आहे. २७ मे रोजी मतदान होणार असून २८ मे रोजी शिरूर तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

शिरूर ग्रामीण सरपंच पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव असून तर्डोबाचीवाडी सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. अण्णापूर सरपंच पदासाठी सर्वसाधारण साठी राखीव असून सरदवाडी सरपंच पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव आहे कर्डेलवाडी या सरपंच पद्साठी सर्वसाधरण पदासाठी राखीव असून वाजेवाडी सरपंचपदासाठी सर्वसाधरण पदासाठी राखीव आहे. या सर्व भागात आचारसंहिता लागू झाली आहे. विधानसभा व लोकसभेपूर्वी होत असलेल्या सहा गावांमधील निवडणूकांकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील राजकीय नेत्यांनीही या गावांमध्ये लक्ष घालण्यास सुरवात केली आहे.

You might also like
Comments
Loading...