लोकसभा निवडणुकांआधी भाजपला धक्का, आणखीन एका मित्रपक्षाचा रामराम

महाराष्ट्र देशा: केंद्रातील सत्ताधारी भाजपकडून आगामी लोकसभा आणि काही राज्यातील विधानसभा निवडणुकांची तयारी करण्यात येत आहे, अशातच गेली अनेक वर्ष मित्रपक्ष असणारे त्यांची साथ सोडताना दिसत आहेत. शिवसेना, तेलगु देसम पाठोपाठ आता पंजाबमध्ये मित्रपक्ष असणाऱ्या शिरोमणी अकाली दलाने भाजपला सोडचिट्ठी देण्याच जाहीर केलं आहे.

शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी हरियाना विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक स्वतंत्र लढवण्याची घोषणा केली आहे. पिपलीनगर येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी ही घोषणा केली.

पंजाबमधील जनतेला दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण केले आहे. आता हरियाणामधील जनतेच्या विकासासाठी, तसेच नवा इतिहास घडवण्यासाठी पंजाबी लोकांनी एकत्र येण्याची गरज असल्याच यावेळी सुखबीर सिंग बादल म्हणाले. राज्यामध्ये अकाली दलाची सत्ता आल्यास शेतीला मोफत वीज, सर्व शेतांमध्ये मोफत पाईपलाईन, दलितांसाठी प्रति महिना ४०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा बादल यांनी केली आहे.

You might also like
Comments
Loading...