एशियाड स्पर्धा : वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यान रौप्य पदकाला घातली गवसणी

टीम महाराष्ट्र देशा : १८ व्या एशियाई खेळाच्या पाचव्या दिवशी टेनिसपटू अंकिता रैनाने भारताला कांस्य पदक जिंकून दिल्यानंतर, भारताचा युवा नेमबाज शार्दुल विहानने पुरुष डबल ट्रॅपमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी शार्दुलनं केलेल्या या प्रराक्रमामुळे त्याचं सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे. भारताच्या खात्यात एकूण चार रौप्य पदक जमा झाले आहेत. कोरियाच्या ह्यूनवुडला या प्रकरात सुवर्णपदक मिळाले. तर कतारच्या हमाद अलीला कांस्य पदक मिळाले. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांचा सिलसिला पाचव्या दिवशी देखील सुरू आहे. आतापर्यंत भारताने १७ पदकांची कमाई केली आहे.

स्पर्धेच्या अंतिम फेरीत विहान सुरुवातीपासून आघाडीवर होता. पण जेव्हा फक्त तीन स्पर्धक उरले तेव्हा विहानला शिनने कडवे आव्हान दिले. सुवर्णपदकासाठी जेव्हा स्पर्धा सुरु झाली तेव्हा शिननने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि ती कायम ठेवली. यावेळी विहानला त्याच्याकडून झालेल्या चुकांचा फटका बसला. शिनने आघाडी घेतल्यावर विहानला त्याची मक्तेदारी मोडणे जमले नाही, तशी संधी शिनने दिली नाही. त्यामुळे विहानला अखेर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आणि भारताचे एक सुवर्णपदक हुकले.

डबल ट्रॅप क्रीडा प्रकारात शार्दुल विहानने पुरुष गटात जबरदस्त कामगिरी केली. शार्दुलने 141 गुणांची कमाई करत अंतिम फेरीत स्थान मिळवलं. त्यानंतर अंतिम फेरीत 73 गुण मिळवत रौप्य पदकाची कमाई केली. शार्दुलनं पदक पटकवल्याने हिंदुस्थानच्या पदकांची संख्या 17 झाली आहे. यामध्ये 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या अंतिम फेरीत कोरियाच्या ह्यूनवू शिन याने सुवर्ण, तर कतारच्या हामिद अली याने कांस्य पदकाची कमाई केली आहे.

धनंजय केळकर यांना भारतीय व्यक्तींच्या पायाच्या मानकासह फुटवेअर बनविण्याचे पेटंट