fbpx

शिर्डीत मुरकुटेंचा काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळेंना पाठिंबा

टीम महाराष्ट्र देशा : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रीरामपूर तालुक्यातील विकासाच्या प्रश्नावर दिलेल्या आश्वासनानंतर हा निर्णय घेतल्याचे मुरकुटे यांनी सांगितले.

स्वागत मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात मुरकुटे यांनी आपली भूमिका जाहीर केली. आमदार कांबळे यांनीही भुमिका जाहीर केल्यानंतर उपस्थिती लावली. दरम्यान उमेदवार कांबळे यांनी मेळाव्यास नंतर उपस्थित राहत मुरकुटे यांचे आभार मानले.