पूरग्रस्तांच्या मदतीला धावले शिर्डी संस्थान, १० कोटी रुपयांचा देणार निधी

टीम महाराष्ट्र देशा : पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्याने कोल्हापूर, सांगली, कराड आदी भागांत प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. हजारो नागरिक बेघर झाले आहेत. अशा आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत मिळावी, यासाठी अनेक संस्था आणि प्रशासकीय यंत्रणा पुढे आल्या आहेत. तर शिर्डीच्या साई संस्थानाने देखील आता पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

संस्थानने पूरग्रस्तांना १० कोटी रुपयांची भरीव मदत केली आहे. तसेच डॉक्टरांची टीम औषधे उपलब्ध करुन देणार आहेत, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी ट्विट करून दिली आहे. तर शिर्डीच्या वतीने राज्यातील पुरग्रस्तांच्यामदतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी न्यायालयीन प्रक्रियेस अधिन राहुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस  देणार असल्याची माहिती संस्थानच्या अध्यक्षांनी दिली.

दरम्यान या जल आपत्तीमुळे कोल्हापूर आणि सांगलीचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिक मुलभूत गोष्टींपासून वंचित आहेत. तर अनेक नागरिक अजूनही पुराच्या पाण्यात अडकले आहेत. प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरु आहे. मात्र प्रशासन कुठं तरी कमी पडल्याचं स्पष्ट दिसत आहे. लष्करी बचाव यंत्रणांनी वेळीचं हजेरी लावत हाताबाहेर गेलेली परिस्थिती आटोक्यात आणली आहे. मात्र आपत्ती टळली असली तरी नागरिक विस्थापित आहेत. अन्न , वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत.

 

पूरग्रस्तांना मदतीची गरज, विमानातून घिरट्या घालून काही होणार नाही – आंबेडकर
कोल्हापूरसाठी वाट्टेल ती मदत करायला उतरलोय, खा संभाजीराजे धावले पूरग्रस्तांच्या मदतीला