fbpx

विनापरवाना भक्तनिवास व भोजनालय बांधल्याप्रकरणी शिर्डीच्या साईबाबा संस्थानला दंड

नगर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानने निमगाव कोऱ्हाळे हद्दीत विनापरवाना भक्तनिवास व भोजनालय बांधल्याप्रकरणी तब्बल चार कोटी ३२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम भरून बांधकाम नियमित करून घेण्याचा आदेश तहसीलदारांनी दिला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते ज्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले, तिच्या बांधकामाबद्दल खात्री का करण्यात आली नाही, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे. साईभक्ताने दिलेल्या देणगीतून संस्थांनने या इमारती बांधल्या आहेत. त्यासाठी आ‌वश्यक असलेली पूर्तता महसूल विभागाकडे करण्यात आली नव्हती. चौकशीत हे सिद्ध झाल्याने तहसलीदारांनी रक्कम भरून बांधकाम नियमित करून घेण्याचा आदेश दिला.