fbpx

शिर्डीत कर्नाटकच्या बंडखोर आमदारांविरोधात युवक कॉंग्रेस आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटकमधील बंडखोर आमदार सध्या मुंबईत वास्तव्याला होते. आज ते शिरीला देवदर्शन करण्यासाठी शिर्डी विमानतळावर पोहोचले आहेत. परंतु या आमदारांविरोधात युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी यांनी शिर्डी विमानतळावर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली आहे.

सत्यजीत तांबे यांनी ही घोषणाबाजी करण्याचे कारण म्हणजे हे जे आमदार आहेत त्यांनी कॉंग्रेसशी गद्दारी करून भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे कर्नाटकमधील कॉंग्रेस-जेडीएस सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. कर्नाटकमधील या परिस्थितीला हे बंडखोर आमदारचं जबाबदार आहेत. त्यामुळे तांबे यांनी या आमदारांचा निषेध नोंदवत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण देशात कॉंग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. अशा काळात कार्यकर्त्यांनी पक्षाला पाठींबा देण्याची गरज असताना या आमदारांनी पक्ष सोडल्याने सत्यजीत तांबे यांनी हा विरोध दर्शवत जोरदार घोषणाबाजी केली आहे.